रत्नागिरी : महागाई विरोधात विरोधी पक्षांनी उद्या पुकारलेल्या भारत बंदमध्ये राज्यातील पेट्रोलपंप चालक सहभागी होणार नाही,अशी माहिती फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली.
वाढती महागाई त्यात दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. या महागाईविरोधात उद्या काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी भारत बंदची हाक दिली आहे. दरम्यान उद्याच्या बंदमध्ये पेट्रोलपंप चालक सहभागी होणार नाही, त्यामुळे उद्या पेट्रोलपंप सुरु राहणार असल्याची उदय लोध यांनी दिली. सीआयपीडीच्या निर्णयानुसार फामपेडा या बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे उदय लोध यांनी सांगितलं आहे.
बंद काळात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पेट्रोलपंप चालकांनी स्थानिक पातळींवर निर्णय घेउन स्वत:च्या मालमत्तेची काळजी घेण्याचं आवाहन लोध यांनी केलं आहे