मुंबई । नागरिकांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, या हेतूने भांडूपमध्ये उत्साही मंडळाने एक हजार कुटुंबांना ‘आर्सेनिक अल्बम’ या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. भांडुपमध्ये दाटीवाटीचा परिसर आहे. तो कमी व्हावा हाही यामागील उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी भांडुप पश्चिम विभागात पहिल्या टप्यात एकूण 1000 कुटूंबाना 90000 होमियोपॅथीक गोळ्या आर्सेनिक अल्बम 30 वाटप करण्यात आले आणि पुढील टप्यात 5000 कुटूंबियांना या गोळ्यांचे वाटप करण्याचे नियोजन असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
सध्याची वेळ खूप खराब आहे. आमच्या मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक कार्य राबविण्यात येत आहेत. विभागात सॅनिटायझेशन करणे, नागरिकांना भाजी वाटप देखील आमच्या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढते यामुळे आम्ही या गोळ्या घरात घरात वाटण्याचे ठरविले. योग्य उपाय योजना केल्या तरच आपण कोरोनाला हरवू शकतो अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अमित भोगले यांनी सांगितले.