मुंबई, (निसार अली) : रिपब्लिकन चळवळीतील अग्रणी नेते शहीद भाई संगारे आणि प्रसिद्ध कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतिदिना निमित्त सातरस्त्यातील चार चाळ येथील शहीद भाई संगारे उद्यानात श्रद्धांजली सभा घेण्यांत आली. आंबेडकरी चळवळीची झालेली अधोगती लक्षात घेता भाईंची आठवण येते अशी प्रतिक्रिया उपस्थित काही वक्त्यांनी व्यक्त केली. तसेच नामदेव ढसाळ यांच्या आठवणी जागविण्यात आल्या.
गोपालराव फुलपगार हे अध्यक्ष स्थानी होते तर धर्मेंद्र दबडे यांनी सूत्रसंचालन केले. केंद्रिय समाजकल्याण राज्य मंत्री रामदास आठवले, तानसेन ननावरे , गौतम सोनावणे, आशाताई लांडगे, रवी गरुड, शंतनू डोळस, बहुजन विद्यार्थी परिषदेचे चंद्रशेखर कांबळे , कवी विवेक मोरे आदी यावेळी उपस्थित होते .
पञकार दिलिप हुनाळेकर यांचा विशेषांक “चळवळ रत्न ” व तानाजी कांबळे यांच्या “महाराष्ट्र संध्या ” या भाईंवरील साप्ताहिकाचे प्रकाशन रामदास आठवले यांनी केले.