‘कोविड-१९’ या घातक विषाणूने केवळ लोकांच्या हालचालींवर मर्यादा आणल्या नाहीत तर शारीरिक स्वच्छतेलाही केंद्रबिंदू बनवले आहे. या आजाराला दूर ठेवण्यासाठी वारंवार हात स्वच्छ धुवणे आणि सॅनिटायझर्सचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यातच आता पुरूषांनी दाढीची काळजी घेणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे झाले आहे. आपली दाढी रूबाबदार असावी, असे प्रत्येकालाच वाटतं. परंतु, ही दाढी वाढवल्याची ही सवय आजारांना निमंत्रण ठरू शकते. हे माहिती आहे का? कारण, बऱ्याचदा हाताने दाढी करताना हातातून चेहऱ्यावर विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढवण्याची शक्यता असते.
सध्याच्या फॅशनच्या युगात कोणती स्टाईल कधी लोकप्रिय होईल हे सांगणं अवघड आहे. आतापर्यंत मुलांमध्ये क्लिन शेवच्या ट्रेंडची चलती होती. पण आता सगळेजण दाढी वाढवताना दिसत आहेत. चेहऱ्यावर थोडी किंवा दाट दाढी त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये भर पाडण्यास उपयुक्त ठरते. पण दाढी वाढवणं जरी सोप असलं तरी सुद्धा तिची काळजी घेणं हे तितकचं अवघड आहे. ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँण्ड प्रिव्हेंशन’ (सीडीसी) या संस्थेने दाढी वाढवणाऱ्या व्यक्तींना व्हायरसचा धोका सर्वाधिक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस केसांची आणि दाढीची योग्य पद्धतीने निगा राखणे गरजेचं आहे.
अशी घ्या तुमच्या दाढीची काळजी –
दाढी नियमितपणे धुणे – केसांसह दाढी सुद्धा नियमित धुतली पाहिजे. दाढी धुवल्यासाठी केसांच्या शेम्पूचाच नव्हेतर केसांचे कंडिशनर वापरावेत. याशिवाय दाढीच्या शेम्पूचाही वापर करता येऊ शकतो, यामुळे विषाणूंचा प्रादुर्भाव आणि बॅक्टेरिया किंवा बुरशीजन्य संसर्गाची शक्यता कमी होते.
दाढीला नियमित ब्रश करा – दाढीला दररोज ब्रश केल्याने मृत त्वचा निघून जाते आणि केसांच्या मुळांना योग्य पद्धतीने रक्तपुरवठा होण्यास मदत मिळते. त्यामुळे दाढी नियमितपणे घासणे महत्त्वाचे आहे. यामुळे दाढी अधिकच चमकदार दिसते.
दहीचा वापर करावा – दाढी केल्यानंतर चेहऱ्याची आग होते, किंवा चेहऱ्यावर डाग दिसतात, अशी तक्रार अनेकजण करतात. अशावेळी त्वचा सुंदर दिसावी, यासाठी दहीचा वापर करणे योग्य आहे. दहीमध्ये लॅक्टिक अँसिडचं प्रमाण अधिक असते.
मॉइश्चरायझर्सचा वापर – दाढीचे तेल किंवा मॉइश्चरायझिंग हे तुमच्या दाढीचे केस हेल्दी ठेवतात. रक्ताभिसरण क्रियाही योग्यपद्धतीने कार्य करते. त्यामुळे केस अधिक आकर्षित दिसतात. याशिवाय, मॉइश्चरायझर्स त्वचेला नैसर्गिक हायड्रेशन प्रदान करतात.
दाढीचे आकारमान – बऱ्याचदा लोक घरातच दाढी ट्रिमिंग किंवा आकार देण्याला अनन्यसाधारण महत्त्व देतात. दाढी सुंदर दिसावी हा यामागील उद्देश असतो. परंतु, दाढीला योग्य आकार दिल्यास ती अधिक आकर्षित दिसते. याशिवाय चांगली दिसणारी दाढी डोळ्याच्या सौंदर्यातही भर घातले.
– डॉ. मोहन थॉमस, वरिष्ठ कॉस्मेटिक सर्जन, कॉस्मेटिक सर्जरी इन्स्टिट्यूट मुंबई