मुंबई, विशेष प्रतिनिधी:- इंग्लंडमध्ये कोविडचा नवीन प्रकार आढळला असून, त्याचा वेगाने फैलाव होत आहे. त्यामुळे मागील एक महिन्याच्या कालावधीत युकेमधून मुंबईत आलेल्या नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, कोरोना विषयक लक्षणे आढळल्यास त्वरीत वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
इंग्लंडमध्ये कोविडचा नवा प्रकार झपाट्याने पसरतो आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक सूचना केल्या असून सुनिश्चित कार्यपद्धती देखील ठरवली आहे. या नवीन प्रकारच्या विषाणुचा प्रसार मुंबईमध्ये होऊ नये, यासाठी पालिकेकडून खबरदारी घेतली जाते आहे.
या पार्श्वभूमीवर जे नागरिक इंग्लंडमधून दिनांक २५ नोव्हेंबर २०२० पासून म्हणजे एक महिना कालावधीमध्ये मुंबईत आलेले आहेत, त्यांच्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. युकेमधून परतलेल्या नागरिकांनी महानगरपालिकेच्या वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधावा. तसेच कौटुंबिक वैद्यकीय सल्लागार, नजीकचे महानगरपालिका दवाखाने, आरोग्य केंद्र यांच्याकडे प्राथमिक वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. युकेमधून परतलेल्या नागरिकांनी शंका दूर करण्यासाठी कोविड १९ चाचणी करुन घ्यावी. तसेच मास्कचा सुयोग्य वापर, हातांची नियमित स्वच्छता, सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा कटाक्षाने अवलंब करावा. सोबत आपल्या कुटुंबाची देखील योग्य ती काळजी घ्यावी. कोणतेही लक्षण, असल्यास घाबरुन जाऊ नये. त्वरेने महानगरपालिकेच्या ‘वॉर्ड वॉर रुम’ कडे संपर्क साधून आवश्यक ती माहिती द्यावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
…
येथे संपर्क साधावा —
ए – ०२२-२२७००००७
बी – ०२२-२३७५९०२३
सी – ०२२-२२१९७३३१,
डी – ०२२-२३८३५००४
— ई – ०२२-२३७९७९०१
— एफ/दक्षिण ०२२-२४१७७५०७
– एफ/उत्तर ०२२-२४०११३८०
– जी/दक्षिण ०२२-२४२१९५१५
— जी/उत्तर ०२२-२४२१०४४१
– एच/पूर्व ०२२-२६६३५४००
– एच/पश्चिम ०२२-२६४४०१२१
— के/पूर्व ०२२-२६८४७०००
– के/पश्चिम ०२२-२६२०८३८८
— पी/दक्षिण ०२२-२८७८०००८
— पी/उत्तर ०२२-२८४४०००१
– आर/दक्षिण ०२२-२८०५४७८८
— आर/उत्तर ०२२-२८९४७३५०
– आर/मध्य ०२२-२८९४७३६०
– एल ०२२-२६५०९९०१
— एम/पूर्व ०२२-२५५२६३०१
– एम/पश्चिम ०२२-२५२८४०००
— एन ०२२-२१०१०२०१
– एस ०२२-२५९५४०००,
– टी ०२२-२५६९४०००
.