मुंबई : बेस्ट प्रशासनाने कामगारांचे वेतन रखडवले असल्याने त्यांना आर्थिक चणचणीला सामोर जावे लागत आहे. १३ मार्चला उजाडला तरी कामगारांचे फेब्रुवारी महिन्याचा पगार झालेला नाही. त्यामुळे बेस्टविरोधात संतापाची भावना निर्माण झाली आहे. परंतु, येत्या १५ मार्चला कामगारांना त्यांचे वेतन मिळेल, अशी कबुली बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी दिली आहे.
कामगारांना फेब्रुवारी महीन्याचा पगार मार्चच्या १ ते ३ तारेखपर्यंत मिळायला हवा होता. महीन्याच्या ३ तारखेपर्यंत पगार त्यांच्या खात्यात वळता होतो. यावेळी १३ मार्च उजाडला तरीही पगार झालेला नाही. हाती पैसा नसल्याने होळीचा सणही कामगार साजरा करु शकले नाही. याआधी कामगारांनी प्रशासनाविरोधात वडाळा डेपोत तीव्र आंदोलन केले होते.
आर्थिक तंगीमुळे कामगारांना पगार देण्यास विलंब झाला आहे. १५ मार्चपर्यंत कुठल्याही परिस्थितीत पगार होईल, असे स्पष्टीकरण महाव्यवस्थापक पाटील यांनी दिली आहे.