मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती आज शुक्रवारी १४ एप्रिल रोजी बेस्ट भवन, कुलाबा आगार येथे साजरी करण्यात आली. या प्रसंगी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. बेस्ट समिती सदस्य सुनिल गणाचार्य, बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील, बेस्टचे अतिरिक्त महाव्यवस्थापक संजय भागवत तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.