मुंबई : बेस्ट उपक्रमाने २० मार्चपर्यंत कामगारांवे वेतन न दिल्यास २१ मार्चपासून जो पर्यंत” पगार मिळत नाही तोपर्यंत कामगार कामावर जाणार नाहीत, असा आक्रमक पवित्रा आता बेस्टमधील सर्व कामगार संघटनांनी एकमताने घेतला आहे. आज बेस्टमधील सर्व कामगार संघटनांची बैठक बाळ दंडवते स्मृती, ना. म. जोशी मार्ग येथे बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांच्या नेतॄत्वाखाली पार पडली, अशी माहिती बेस्ट वर्कर्स युनियनचे उपाध्यक्ष रुपेश पाटील यांनी दिली.
बेस्ट कामगार-कर्मचार्यांच्या” प्रलंबित वेतनाच्या प्रश्नावर यावेळी प्रामुख्याने चर्चा झाली. बेस्ट उपक्रमाचा कामगार हा मुबई महानगरपालिकेचा कामगार असल्याकारणाने त्यांना वेळेवर वेतन देण्याची जबाबदारी पालिकेची आहे, असे यावेळी सांगण्यात आले. बेस्टची बससेवा मुबई महापालिकेने अनुदानित तिकीट दराने मुबईकतील नागरिकांना पुरविण्यात आली आहे. त्यामुळे फायदा-तोट्याचा विचार करणे योग्य नाही, असे मत उपस्थित पदाधिकार्यांनी व्यक्त क्ले. त्याशिवाय बेस्ट उपक्रम सातत्याने तोट्यात आहे, असे सांगून हा खासगीकरणाचा डाव आहे, असे मत उपस्थितांनी मांडले. अन्यायकारक कॅनडा शेड्यूलचा करार संपत आहे, त्याचे नूतनीकरण करू नये, यावरही उपस्थितांनी सहमती दर्शविली.
बेस्ट वर्कर्स युनियन, बेस्ट कामगार सेना, बेस्ट परिवहन कर्मचारी सघ, समर्थ बेस्ट कामगार सघटना, बेस्ट जागृत कामगार सघटना, बेस्ट कामगार युनियन, भाजपा बेस्ट कामगार सघ, बेस्ट कामगार सघटना, बेस्ट एम्प्लोईज युनियन आणि बॉम्बे इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे
पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.