मुंबई: बेस्टच्या तिकीट भाडेवाढीचा आजपासून मुंबईकरांना चटका बसणार आहे. टप्प्यांमागे कमीतकमी एक रुपयांपासून ११ रुपयांपर्यंत वाढ केली आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मासिक व दैनंदिन पासमध्ये वाढ केली असून गुरुवारी १२ एप्रिलपासून या भाडेवाढीची अंमलबजावणी होत आहे.
बेस्टची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. बेस्टला बाहेर काढण्यासाठी बेस्टने भाडेवाढीचा करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन टप्प्यामध्ये कोणतीही वाढ केलीली नाही. मात्र, त्यानंतर एक रुपयापासून ११ रुपयांपर्यंतही वाढ केली आहे. पासमध्येही २० रुपयांची वाढ, विद्यार्थ्यांच्या बसपासमध्ये ५० तर एसी बसच्या तिकीटांत किमान ५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. बोरीवली, ठाणे, मुलुंड आणि खारघर ते वांद्रे-कुर्ला संकुलादरम्यान १५ ते २० रुपयांच्या भाडेवाढीला बुधवारी मुंबई मेट्रोपोलिटन रिजन ट्रान्सपोर्ट अथाॅरिटीने मंजुरी दिली. दैनंदिन बसपास शहरासाठी ५० रुपये, उपनगरासाठी ६० रुपये तर सर्वत्र मुंबईसाठी ९० रुपये असा असले. स्वातंत्र्य सैनिकांना, ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांग व्यक्तींना तसेच महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळा आणि घरादरम्यान बेस्टची मोफत सेवा यापुढेही चालू राहणार आहे. जेष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलतीच्या योजनेची अंमलबजावणी होई पर्यंत एसी बससेवा वगळता मासिक बसपासामध्ये ५० रुपये तर त्रैमासिक बसपासमध्ये २०० रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान दैनंदिन बसपासमध्ये असलेली ५० टक्के सवलतीची आनंदयात्री योजना रद्द करण्यात आल्याचे बेस्टने कळवले आहे.
अशी असेल दरवाढ (रुपयात)
कि.मी. सध्याचे भाडे सुधारित भाडे एसी भाडे
२ ८ ८ २०
४ १० १० २५
६ १४ १५ ३०
८ १६ १८ ३५
१० १८ २२ ४०
१२ २० २५ ४५
१४ २२ २८ ५०
१७ २४ ३२ ५५
२० २६ ३४ ६५
२५ २८ ३७ ८०
३० ३० ४२ ९५
३५ ३६ ४७ ११०
शालेय बस पास
मासिक त्रैमासिक वार्षिक
पाचवी पर्यंत २०० ६०० १०००
सहावी ते दहावी २५० ७५० १२५०
११, १२ वी पदविका ३५० १०५० १७५०