मुंबई, (निसार अली) : मुंबईची जीवनवाहिनी असणार्या बेस्ट बसेसमधील अग्नीसुरक्षेबाबत प्रशासनाची असणारी बेफिकीरी माहिती अधिकारातंर्गत उघडकीस आली आहे. ज्यात २६४८ बसेसमध्ये अग्निरोधक यंत्रे असून ११५० बसेसमध्ये ती बसविली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बसमधून प्रवास करणार्या लाखो प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत.
बेस्टच्या नियमानुसार प्रत्येक बस दोन अग्नीरोधम यंत्र बसविणे बंधनकारक आहे. असे असताना या नियमांची पायमल्ली करण्याचे काम प्रशासनाने केले आहे.
महिलांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसंबंधीही बेस्टकडे कोणतेही धोरण नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाल आहे. महिलांसाठी सिंगल डेकर बसमध्ये १२, डबल डेकरमध्ये १० आसने आरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. अत्यावश्यक सेवेसंबंधी ही कोणतिही माहिती देण्यात आलेली नाही. वाहकाला(conductor) माहिती दिल्यावर तो त्याच्या नुसार कारवाई करेल, असे सांगण्यात आले आहे.
हेल्पलाइनसंबंधी प्रश्न विचारल्यावर हेल्पलाइन आहे आणि त्याचा क्रमांक १८००२२७५५० हा आहे ती २४ तास ही काम करते, असे सांगितले आहे. परंतु, ही माहिती प्रवाशांपर्यंत कशी पोहोचवावी याबाबत काहीच धोरण नसल्याचे समोर आले आहे. बेस्ट प्रशासनाने हेल्पलाइन ची माहिती प्रवशांकड़े पोहोचविण्याची व्यवस्था करावी, तसच प्रवशांचे सुरक्षासंबंधी धोरण जाहीर करावे, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते शारिक यांनी केली आहे.
दुर्घटना
काही महिन्यांपूर्वी बेस्टच्या बसला आग लागण्याची घटना घडली होती. यावेळी प्रवासी बचावले आहेत. तसेच ११ एप्रिलला ३५९ क्रमांकाच्या बसच्या रेडिएटरमधील पानी गरम झाल्याने बसमध्ये धूर झाला होता. चालकाने बस त्वरित थांबवल्याने दुर्घटना टळली होती.
>>>>>>>>
बेस्ट समितीच्या पुढच्या बैठकीत आम्ही हां मुद्दा घेवू . मागे घडलेल्या घटनेनंतर आम्ही प्रशासनाला या बाबत विचारणा केली होती. परंतु, समाधानकारक उत्तर मिळाले नव्हते. बेस्ट हा मुंबई पालिकेचा उपक्रम असल्याने पालिकेने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना कराव्यात- भूषण पाटिल, बेस्ट समिती सदस्य