रत्नागिरी : कोकणात विशेषत: रत्नागिरीत श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या मंदिरात नाम सप्ताह आणि एक्का साजरा केला जातो. शंकराला बेल हा वृक्ष प्रिय आहे. डॉ. दिलीप नागवेकर यांचे संकल्पनेतून यावर्षी पोमेंडी येथे रामेश्वर मंदिराच्या हरी नाम गजरानिमित्त ५० बेल रोपांचे वाटप मोफत करण्यात आले. त्यावेळी बेलवृक्षाचे महत्त्व डॉ. दिलीप नागवेकर यांनी विषद केले. प्रास्तविक दीपक मोरे यांनी केले. रोपांचे वाटप जयवंत नागवेकर, सौ. दीपिका नागवेकर, डॉ. दिलीप नागवेकर आणि नंदकिशोर सुर्वे, बाळकृष्ण नागवेकर, शरद नागवेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिराच्या न्यासाचे ट्रस्टी कोषागार शरद नागवेकर आणि ग्रामस्थ बाळकृष्ण नागवेकर, मनोहर रहाटे, रणजित चाळके, विजय नागवेकर, चंद्रशेखर नागवेकर यांनी विशेष मेहनत घेतली. त्याचबरोबर यावर्षी या रोपांची लागवड करुन ती जगवून पुढच्या वर्षी श्रावणात या झाडांची पाने आम्ही रामेश्वराला अर्पण करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. अशाच प्रकारचा कार्यक्रम गेल्या वर्षी तोणदे गावी जयवंत नागवेकर यांच्या कुटुंबीयाकडून आयोजित केला होता.