मुंबई,(निसार अली) : मालवणी, मालाड, कांदिवलीमधील बेघर नागरिकांना अक्षय तृतीयेच्यानिमित्ताने साक्षर वेल्फेअर सोसायटीच्या वतीने आमरसपूरीचे वाटप करण्यात आले. आज अचानक आमरस पूरी मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. साक्षर वेल्फअर सोसायटी लॉक डाउन सुरु झाल्यापासुन दररोज 1400 बेघर असंघटित कामगार आणि गरजूंना दोन वळेचे शिजवलेले अन्न पुरवत आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने बेघरांना देखील काही क्षण आनंद मिळावे व सर्व सामान्य सारखे त्यांना ही वाटावे या उद्देशाने आम्ही त्यांना चांगल जेवण व वेगळे देण्याचे प्रयत्न केला, असे साक्षर वेल्फेअरकडून सांगण्यात आले.