मुंबई , दि. 2 : वरळी येथे रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या कामाचा शुभारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आजच हे काम सुरू व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केल्यानुसार विनाविलंब या कामास सुरूवात झाली असून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वतः जाऊन या कामाची पाहणी केली.
पर्यावरण मंत्री श्री.ठाकरे यांनी येथील तंत्रज्ञांसमवेत पुढील कामासंदर्भातील चर्चा केली. त्याचबरोबर येथे उभारलेल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुनर्विकास आराखड्याची संपूर्ण माहिती घेतली. हा प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण होण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.