
लेखक : माजी न्यायाधीश अनिल वैद्य..
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्या लाखो अनुयायांसोबत हिंदु धर्म सोडून बौद्ध धम्म स्वीकारला. जुन्या धर्मातील अनिष्ट परंपरा सुध्दा नाकारल्या .पण काही बौद्ध संस्कृती मध्ये असलेल्या परंपरा हिंदू परंपरेसमान वाटत असल्याने त्यालाही धर्मांतरित बौद्धांकडून नकार दिला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यापैकी उपवास हा हिंदू लोक करतात तर बौद्ध परंपरे मध्ये उपोसथ आहे. दोन्हीही नामाभिधान सारखे वाटत असल्याने बौद्ध उपासकांचा गैरसमज होतो.
काही बौद्ध बांधव तर बुद्धाने व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी उपोसथ सांगितलेच नाही म्हणतात. तर काही म्हणतात की ,ते फक्त भिक्कु साठी आहे, असे उपोसथ विरोधी लोक उपोसथ करणाऱ्याचा उपहास करतात.उपोसथ करणाऱ्यास हिंदू मानसिकतेचा समजून टिंगल करतात. म्हणून यावर सदर लेखाद्वारे प्रकाश टाकण्यात आला आहे.
^^^
बौद्ध लोक उपोसथ हे पौर्णिमा व अष्टमीला करतात.तर हिंदूंचा उपवास दिवसानुसार असते. कुणी सोमवार धरतो. कुणी,शनिवार, कुणी शुक्रवार इत्यादी त्यांच्या देवाच्या दिवसानुसार ते उपवास करतात. तसे बौद्ध परंपरेत नाही.
धम्म ग्रंथात अर्थात भ बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात
“सप्ताहा मागून सप्ताह उपोसथ करा” असे नमूद केले आहे. पण बौद्ध परंपरेत पौर्णिमा ,अष्टमी, चतुर्थी या दिवशी उपोसथ करतात. नेमका एका विशिष्ट दिवशी उपोसथ धरीत नाहीत. उपोसथ करण्यासाठी त्या दिवशी आठ शील पालन करायचे असते. पंचशील आणि तीन अधिक शील (5+3=8.)
दुपारी 12 वाजे पूर्वी जेवण करायचे व सायंकाळी किंवा रात्री जेवायचे नसते. उपासकाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी उपोसथ चांगले असल्याने बुद्धाने उपासकाला उपोसथ करण्याचा उपदेश दिला असावा. बुद्ध विनाकारण तर उपदेश देणार नाहीत.ते स्वतः व भिक्कू संघ एकदाच भोजन करायचे. भ बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात उपोसथा बद्दल खालील उल्लेख आहेत.
. ‘हिंसा, चोरी, असत्य भाषण, सुरापान, व्यभिचार ह्या पासून परावृत्त व्हा.
*’सप्ताह मागून सप्ताह, उपोसथाचे वत ग्रहण करा आणि श्रद्धामय अंत:
करणाने अष्टशील चे पालन करा.
‘प्रातःकाळी पवित्र श्रद्धामय चित्ताने वरील उपोसथ व्रत स्वीकारल्यानंतर यथाशक्ती भिक्खूंना अन्न आणि पेय द्या.
‘आपल्या आईवडिलांचा सन्मान राखा. उपजीविका सन्मानाने करा.
‘असा एकनिष्ठ उपासक दिव्य जगात प्रदेश करील.’
यावरून स्पष्ट होईल की, धम्म हा दोघाना समान आाहे.
(संदर्भ :-भ बुद्ध आणि त्यांचा धम्म भिककुचा धम्म व उपासकाचा धम्म
पृष्ठ ३४५ इंग्रजी 399)
दुसरा संदर्भ
हत्या करू नका. चोरी करू नका. खोटे बोलु नका. उन्मादक पेय व्यभिचार करू नका. भर रात्री कुग्रास अन्न सेवन करू नका.
गंध माला धारण करू नका. आपला बिछाना भूमीवर पसरा. प्रत्येक उपोषणाच्या दिवशी हे व्रत ग्रहण करा आणि शुद्ध अंतःकरणाने हे अष्टांगिक व्रत मनासारखे पाळा
भगवान बुद्धांना, धम्माला व संघाला तीन वेळा वंदन केल्यानंतर त्रिशरण ग्रहण केल्यावर हे आठ शील ग्रहण करण्याची प्रतिज्ञा घ्यायची असते. ते खालीलप्रमाणे आहेत.
१) पाणातिपाता वेरमणी, सिक्खापदं समादियामि । मी प्राणी हिंसा करणार नाही, अशी प्रतिज्ञा करतो.
२) आदिन्नादाना वेरमणी, सिक्खापदं समादियामि ।
मी चोरी करणार नाही, अशी प्रतिज्ञा करतो.
३) कामेसूमिच्छाचारा वेरमणी, सिक्खापदं समादियामि । मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहीन अशी करतो
४) मुसावादा वेरमणी, सिक्खापदं समादियामि. मी असत्य बोलणार नाही, अशी प्रतिज्ञा करतो.
५) सुरा मेरय मज्ज पमादह्मणा वेरमणी, सिक्खापदं समादिया मी मद्यपान करणार नाही, अशी प्रतिज्ञा करतो
पंचशीलाशिवाय अधिक तीन शील भगवान बुद्धांनी सांगितले आहेत. एकूण आठ शील आहेत, त्याला अष्टशील म्हणतात उपासकांना पंचशील अनिवार्य आहे. उपोसथाच्या दिवशी उपासकांना खालील तीन शिलांचे पालन करायचे असते.
६)विकाल भोजना वेरमणी, सिक्खापदं समादियामि* अवेळी भोजन करणार नाही, अशी प्रतिज्ञा करतो.
७)नच्च- व-गीत-वादित – विसूक-दस्सना, माला-गंध-विलेपन धारण
मण्डन-विभूसनट्टाना, वेरमणी, सिक्खापदं समादियामि
नृत्य, संगीत आणि तमाशा यांच्यात रममान होणार नाही अशी प्रतिज्ञ करतो. पुष्पमाळा, अत्तर, सुगंधी द्रव्य किंवा अलंकार धारण करणा नाही अशी प्रतिज्ञा करतो.
८ उच्चासयना – महासयना वेरमणी, सिक्खापदं समादियामी ।
उच्च बिछाना यापासून अलिप्त राहाण्याची प्रतिज्ञा करतो.
या शिवाय
अष्टांगिक मार्गाचे पण पालन केले पाहिजे .ते असे १- “सम्यक दृष्टी “या तत्वाची व्याख्या केली आहे .सम्यक दृष्टी म्हणजे परिपुर्णता होण्यासाठी असलेली दृष्टी.. जग हे आंधळ्याची जत्रा आहे..वासनेने हपापलेल्या लोकांना जीवनचा मार्ग दिसत नाही जेव्हा आपण अष्टशिलाचे पालन करून तेव्हख जीवनाची पहीली पायरी आहे सम्यक दृष्टी..म्हणजे मुक्त चिंतन ,मुक्त चित्त.
२–सम्यक संकल्प ..यांचा अर्थ असा की आमचे ध्येय ,आमचे कर्म ,आमच्या अपेक्षा ,आमच्या आकांक्षा श्रेष्ठ कल्याणकारी असाव्या त्या अयोग्य असू नये ..ः
३— सम्यक वाणी मनुष्याने सत्यच तेच कथन केले पाहिजे ,असत्य कथन करू नये ,दुसर-याप्रति अभद्र कथन न करणे ,निरर्थक ,व्यर्थ ,मुर्खतापूर्ण कथन न करणे
४सम्यक कर्मात—योग्य आचरणाची करणे
५ ,—सम्यक आजीविका उपजीविका करण्याचे अनेक मार्ग आहेत ,काही हीन आहेत का ही श्रेष्ठ आहेत ,हीन मार्ग इतरांना दुःखी करतात इतरांवर अन्याय करतात श्रेष्ठ मार्ग इतरांचे नुकसान करीत नाही इतरांवर अन्याय करत नाही सम्यक आजीविका असलीच पाहिजे
६—सम्यक व्यायाम–म्हणजे मनात चांगले विचार संवर्धित करणे या साठी परिश्रम घेणे
७—-सम्यक स्मृतीचा अर्थ असा की ,विचारप्रणवता आणि चित्ताची एकाग्रता ,यांचा अर्थ चित्ताची निरतंर जागृकता ,चित्ताने अकुशल वासनांवर निरतंर दृष्टी ठेवणे व ते दूर ठेवणे यालाच सम्यक स्मृती म्हणतात
८—सम्यक समाधी–मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची सवय लावणे
या अष्टनियमाचे पालन करून जीवन संस्कार घडविण्याचे मार्ग आहे..
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीले की,
“प्रात काळी हे व्रत ग्रहण करून धर्मशाली व श्रद्धायुक्त चित्ताने याचकाना अन्न पाणी दान करा”
(संदर्भ:-भ बुद्ध व त्यांचा धम्म :-प्रकरण सदचरणात परिपूर्णता कशी साधता येईल? पृष्ठ३०२ इंग्रजी 355)
तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या पाली शब्दकोशात उल्लेख आहे उपोसथ चा उल्लेख आहे
उपोसथ
(संदर्भ :डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड 16 पृष्ठ 386)
मी आषाढ पौर्णिमे पासून वर्षावास काळात उपोसथ करीत आहे.
उपासकांनी वर्षावासात उपोसथ केलेच पाहिजे असे नाही. परन्तु उपासकांनी केले तर चुकीचेही नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भ बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात असे म्हटले की,जे जे उपदेश भिक्कुला केले ते उपसकानाही लागू आहेत.
भिककुनी मात्र ते कटाक्षाने कडकपणे पालन करायचे आहे ,उपासकाला कडक निर्बन्ध नाहीत ,उपासक स्वेच्छेने निर्णय घेऊ शकतो. हाच तो फरक.
मी नियमित उपोसथ करीत आहे. सकाळी स्नान करून वंदना करून उपोसथ सुरू झाले असे समजतो ,दुपारी १२ वाजेच्या आत जेवण करतो ,रात्री जेवण करीत नाही तर फळं किंवा सूप घेतो. दिवसा चहा तर होतोच.मग दुसऱ्या दिवशी जेवण करतो.
या मुळे छान वाटते,वजनावर नियंत्रण आले,पचनेंद्रियांना अराम मिळतो.भ बुद्धाने हा केलेला उपदेश वैज्ञानिक आहे तो सिद्ध करण्यासाठी मला आलेली प्रचिती म्हणून स्वतःचा अनुभव लिहला आहे. म्हणून मला वाटते बौद्धउपासकाने किमान पौर्णिमेला ,अष्टमी व चतुर्थीला उपोसथ केले पाहिजे. नवीन पिढीलाही धम्म मार्ग सांगितला पाहिजे.
अनिल वैद्य (माजी न्यायाधीश)
🙏🙏🙏🙏🙏🙏















