मुंबई, (निसार अली) : संगीत थेरपीने आजारी प्राण्यांवर उपचार व्हावेत, यासाठी बासरी वादनाचा उपक्रम अनाम प्रेम परिवार या संस्थेकडून राबविण्यात येणार आहे. २४ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय प्रयोग शाळा प्राणी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त या दिवशी दुपारी चार ते संध्याकाळी सात या वेळेत बासरी वादनाचा कार्यक्रम होणार आहे. या संगीत थेरपीचा उपयोग प्राण्यांना व्हावा, असा उद्देश यामागे असणार आहे.
प्रयोग शाळेत प्राण्यांवर प्रयोग करताना त्यांचा छळ होतो. मूक प्राण्यांचा छ्ळ करू नका, असा संदेशदेखील संगीत वादनातून देण्यात येणार आहे. बाल कलाकार परंतप मयेकर आणि धवल जोशी बासुरी वादन करणार आहेत. या पूर्वी या दोघांनी गतिमंद मुलांसाठी असे कार्यक्रम केले आहेत.
नागरिकांनी आपल्या आजारी पाळीव प्राण्यांना सोबत घेवून यावे, असे आवाहन अनाम प्रेमने केले आहे. स्वर सम्राट कुंदन लाल सहगल ओपन एयर थिएटर, राम लीला मैदान, गोशाला लेन, मालाड पूर्व, मुंबई- ९७ येथे कार्यक्रम होईल. संपर्क : ९८७००९०९९४, ९८६९७०१३१५.