मालाड (निसार अली) : मुंबई महापालिका निवडणुकीत सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्यामुळे डॉ. राम बारोट यांनी व्यक्त केली. बारोट हे मालाड पूर्वे येथील प्रभाग क्र. ४५ मधून सलग सहा वेळा भाजपाचे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत तसेच मुंबईचे माजी उपमहापौर राहिले आहेत. पक्षाने महपौरपद दिल्यास ते स्वीकारेन, असेही ते म्हणाले आहेत.
राजकारणात सर्वांनी अपेक्षा बाळगल्या पाहिजेत. पक्षाने मला अनेक पद आणि जबाबदार्या दिल्या आणि त्या मी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. युतीच्या काळात उपमहापौरही होतो, असे बारोट म्हणाले.