रत्नागिरी : बेरोजगार तरुणांना व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होण्यासाठी बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांचेमार्फत नुकतेच 30 दिवसांच्या कालावधीत मोफत फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी विषयाचे मोफत प्रशिक्षण संपन्न झाले. प्रशिक्षणात 29 प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला होता.
या प्रशिक्षण कालावधीत बँक ऑफ इंडिया रत्नागिरी झोनचे झोनल मॅनेजर संतोष सावंतदेसाई यांनी सदिच्छा भेट प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. दरम्यान संस्थेचे संचालक दर्शन कानसे उपस्थित होते. कोकणातील बहुसंख्य तरुण-तरुणी नोकरी निमित्त मोठ्या शहरांमध्ये वळण्यापेक्षा तरुणांनी फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी या सारखे स्वयंरोजगार निर्माण करणारे प्रशिक्षण घ्यावे. स्वत:च्या गावामध्येच व्यवसाय सुरु करून शहराकडे होणारे स्थलांतर थांबवावे, व्यवसाय आत्मविश्वास, आणि चिकाटीने केला पाहिजे, आपले उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे कृती करावी. आर.सेटी मार्फत घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाची माहिती जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहचवावी असे आवाहन झोनल मॅनेजर संतोष सावंतदेसाई यांनी केले.
या प्रशिक्षणासाठी अभिजित गाडेकर यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र सांबरे यांनी केले तर. प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी संस्थेचे प्रशिक्षक प्रसाद कांबळे, विदिशा गावखडकर, ऐश्वर्या पिलणकर व प्रसाद शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली व प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न झाले.
या प्रशिक्षणात फोटोग्राफी आणि व्हिडियोग्राफी, सिनेमॅटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग बेसिक, अल्बम आणि फोटो डिजाइनिंग, स्टुडिओ मॅनेजमेंट, कॅमेरा चे नॉलेज, लेन्स नॉलेज, कॅमेराची काळजी, मॅजिकल फोटोग्राफी, फॅशन पोजेस, वेडिंग आणि इवेंट, इत्यादि. प्रात्यक्षिकासह शिकविण्यात आले. त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास, उद्योजकीय सक्षमता, उद्योजकीय विकास, बँकेच्या विविध योजना याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.