डोंबिवली, (प्रशांत जोशी) : बंजारा समाज हा बहुजन म्हणून ओळखला जातो. भारतात बंजारा समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून देशाच्या कानाकोपऱ्यात हा समाज पसरला आहे. मात्र त्या प्रमाणात समाजाला सरकारी सुविधा मिळत नाही. आता बंजारा समाज आक्रमकपणे आपल्या न्याय हक्कासाठी लढणार असून सरकारला बंजारा समाजाची दखल घ्यावीच लागेल असा विश्वास बंजारा बहुजन क्रांती दल चे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंग राठोड यांनी व्यक्त केला. पक्षाच्या पार पडलेल्या मुंबई प्रांत मेळाव्यात मुंबई विभागाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष बी डी पवार, कर्नाटकचे जिल्हा परिषद सदस्य बीदर अनिल राठोड, मायाताई राठोड इंदोर, विठ्ठल चव्हाण मुंबई, सरणाम सिंह उत्तर प्रदेश, गोविंद महाराज पोहरादेवी, माधव राठोड यवतमाळ, मोहन राठोड मुंबई, राष्ट्रीय प्रवक्ते फुल सिंह नोले राठोड, ज्योती ताई चव्हाण मुंबई, कर्नाटक चित्रपट सृष्टीतील विनय राजवत आदी पदाधिकारी उपस्थित होते.