रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांनी आज रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज भरला. खासदार हुसेन दलवाई, आमदार भास्कर जाधव, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, आमदार हुस्नबानो खलिफे, माजी आमदार हरीश रोग्ये, शेखर निकम आदी पदाधिकारयांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज भरण्यात आला.
दरम्यान अर्ज भरण्यापूर्वी काँग्रेसभवन येथे महाआघाडीची जाहीर सभा झाली. त्यानंतर काॅग्रेसभवन येथून महाआघाडीच्या रॅलीला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते.
दरम्यान आपला विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया बांदिवडेकर यांनी दिली.