रत्नागिरी : वंदनिय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस, शिवसेना नेते तथा खासदार विनायक राऊत यांच्या रत्नागिरी येथील संपर्क कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी सहसंपर्कप्रमुख श्री.राजेंद्र महाडिक, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.विलास चाळके, विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री. प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख श्री. प्रदीप उर्फ बंड्याशेठ साळवी, उपजिल्हाप्रमुख श्री. संजय साळवी, उपजिल्हाप्रमुख श्री. सुजित किर, विधानसभा महिला आघाडी क्षेत्र संघटक सौ.सायली पवार, उपजिल्हा महिला आघाडी संघटक सौ.संध्या कोसुंबकर, महिला आघाडी शहर संघटक सौ. मनीषा बामणे, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, श्रीकृष्ण चव्हाण व महेश पत्की, विभागप्रमुख दिलावर गोदड, विलास पूनसकर, अमित खडसोडे, प्रशांत सुर्वे, सलील डाफळे, रिक्षा सेनेचे श्री अविनाश कदम, उपविभागप्रमुख सचिन भोवड, मा.नगरसेविका रशीदा गोदड, शहर महिला आघाडी विभागप्रमुख रुपाली तवसाळकर, महिला आघाडी शाखा प्रमुख राजश्री लोटणकर, तसेच भाया पावसकर, साजिद पावसकर, राजेंद्र नेरकर व अन्य शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.