
बाळासाहेब जाधव

सुधीर जोगळेकर
मुंबई, गुरुवार – आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या 123 व्या जयंतीच्या निमित्ताने मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार संघाचे अध्यक्ष नरेंद्र विेश्वनाथराव वाबळे यांनी आज जाहीर केला.
2020 सालच्या पुरस्कार दै. `पुढारी’चे संपादक पद्मश्री प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब जाधव यांना जाहीर करण्यात आला आहे. 2020 साली करोनामुळे हा कार्यक्रम झाला नव्हता.
2021 चा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्री. सुधीर जोगळेकर यांना जाहीर करण्यात येत असल्याचे श्री. वाबळे यांना आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. दोन्ही पुरस्कार एकाच कार्यक्रमात प्रदान केले जातील, त्याची तारीख नंतर जाहीर केली जाईल.















