२०१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना गोदरेज ऍग्रोवेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बलराम यादव यांनी सांगितले, “भारतीय शेतीच्याविकासाला चालना देण्यात पशुपालन व मत्स्यपालन ही उद्योगक्षेत्रे बजावत असलेली कामगिरी किती मोलाची आहे, हे आर्थिक सर्वेक्षणात अगदी योग्य प्रकारे आढळूनआले आहे. मत्स्यपालन क्षेत्रात असलेला पायाभूत सोयीसुविधांचा अभाव दूर करण्यासाठी प्रधान मंत्री मत्स्य संपदा योजना सुरु करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. या योजनेमुळे मूल्य शृंखलेतील अनेक कमतरता भरून काढता येतील. पायाभूत सोयीसुविधा, माहिती व वस्तूंचा शोध घेण्याची क्षमता, उत्पादनक्षमता, पीक आल्यानंतरचे व्यवस्थापन व गुणवत्ता नियंत्रण यांचा यामध्ये समावेश असेल. ग्रामीण भागात रस्ते बांधणीवर लक्ष केंद्रीत करणे हे देखील सरकारने उचललेले सकारात्मक पाऊल आहे, त्यामुळे ग्रामीण भाग बाजारपेठेसोबत जोडले जातील. सरकारला आमची अशी विनंती आहे की, स्वयंपूर्णता व शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी खाद्य तेलक्षेत्राला पाठिंबा दिला जावा.”