मुंबई, (निसार अली) : मालाड मधील मालवणी विभागात आज मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी करण्यात आली. ईद निमित्त पोलीस उपायुक्त झोन 11 चे एस. पी. निशनदार, मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे आणि नगरसेवक वीरेंद्र चौधरी यांनी गेट क्र 7 येथील जामा मशीदीत मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. मशिदीच्या विश्वस्तांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.