मालाड, ता. 20 (निसार अली) : देश सेवा समिती आणि भाकर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी नगर गोरेगाव पश्चिम येथे बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम समाजातील असंघटित कामगारांच्या कुटुंबांना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. या सर्व महिलांच्या बालकांना गेले दोन महिन्यांपेक्षा अधिक दिवस पौष्टिक आहार देखील सुरू आहे. या वेळी दिपक सोनावणे, जिनत शेख, जमिला शेख, आरती डोईफोडे, श्रवण खंडागळे उपस्थित होते.















