
गेल्या काही महिन्यांपासून परजिल्ह्यातील बाजार समितीकडून जाचक कर वसुली होत असल्याची तक्रार काजू व्यावसायिक आणि प्रक्रिया उद्योग करणाऱ्या व्यवसायिकांनी केली होती. त्यावर रत्नागिरी बाजार समितीचे सभापती संजय आयरे यांनी माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेतली. यावेळी काजू व्यावसायिक व प्रक्रिया उद्योजक देखिल उपस्थित होते. व्यावसायिक आणि उद्योजकांनि बाजार समितीकडून दोन वेळा घेतला जाणारा सेस, वेअरहाऊसची उपलब्धता, ग्रेडिंग आणि पिलिंग प्लांट आदी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी व्यवसायिक व प्रक्रियादारांनी केली. यावर माजी खासदार यांनी सभापती संजय आयरे यांना काजू व्यावसायिक आणि प्रक्रिया उद्योजकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावेत आणि प्रश्न प्राधान्याने सोडवावे अशी सूचना केली. यावर बाजार समितीचे सभापती संजय आयरे याने निलेश राणे यांच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लवकरच व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्याचे अभिवचन दिले. यावेळी व्यावसायिक आणि प्रक्रिया उद्योजकांनी निलेश राणे यांचे आभार मानले. संजय आयरे यांचेही आभार मानले.
यावेळी काजू प्रक्रिया उद्योग संघटनेचे अध्यक्ष श्री. बारगिर, काजू उद्योजक रविकिरण करंदीकर, संदेश दळवी, ऋषिकेश परांजपे तसेच बाजार समितीचे सचिव प्रमोद मोहिते, लिपिक मंदार सनगरे, नाके सहायक आशिष वाडकर, भाजपाचे सहप्रवक्ते नित्यानंद दळवी, भाजयुमोचे युवक उपाध्यक्ष नंदू चव्हाण उपस्थित होते. यावेळी उद्योजकांनी खंडित झालेली तारण कर्ज सुविधा, सबसिडी आशा आदी विषयांवर निलेश राणे यांच्या सोबत चर्चा केली. हे प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे निलेश राणे यांनी सांगितले.