रत्नागिरी, (आरकेजी) : प्रिंटींग प्रेसचा लोखंडी दरवाजा अंगावर कोसळून तीन वर्षाच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरी जवळच्या मिरजोळे एमआयडीसीत घडली. लक्ष्मी शरणप्पा मँगेरी असे तिचे नाव आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात घडला.
लक्ष्मी लहान मुलांसोबत प्रेसच्या जवळ खेळत होती. यावेळी लोखंडी गेट अचानक लक्ष्मीच्या अंगावर कोसळला. मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक घटनास्थळी धावून आले. अंगावर पडलेला गेट बाजूला करण्यात आला. मात्र, लक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला होता. दुर्घटना कुणाच्या निष्काळजीपणामुळे घडली याचा शोध पोलीस घेत आहेत.