
मुंबई, (निसार अली) : इव्हीएम मशीनद्वारे घेतल्या जाणार्या मतदानाला तीव्र विरोध करत तालुका स्तरीय बहुजन क्रांती मोर्चा विक्रोळी पार्कसाईट येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे काढण्यात आला. या मोर्चात इव्हीएम मशीनचा विरोध करत अनेक वक्त्यांनी मतपेटीसह मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच बहुजन समाजाच्या अनेक मागण्या मोर्चात करण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक मनोज महाले यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. मागण्या मान्य होईपर्यंत मोर्चे सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.














