मुंबई, (निसार अली) : विविध मागण्यांसाठी बहुजन चळवळीतील विविध संस्था आणि संघटनांनी मालाडमधील मालवणी येथे भव्य बहुजन क्रांती मोर्चा काढला. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अम्बोजवाड़ी ते गेट क्र १ म.वा.देसाई उद्यानापर्यंत मोर्चा काढण्यात आला. कांदिवलीहूनही येथे मोर्चा दाखल झाला होता. या ठिकाणी मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले.
केंद्र सरकारविरोधात रोष असताना भाजपला उत्तर प्रदेशात इतके मोठे मताधिक्य कसे मिळू शकते? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. इव्हीएम मध्ये घोटाळा झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी करण्यात आली.
सरकारने झोपडपट्टी पुनवर्सन प्रकल्पात बदल करावा आणि ५०० फुटांचे घर देण्यात यावे, ऎट्रोसिटी क़ायदा आणखी कडक करण्यात यावा, अल्पसंख्याक समुदायाच्या संरक्षणासाठी सांप्रदायिज हिंसाचार प्रतिबंधक क़ायदा बनवण्यात यावा, मत्स्यव्यवसाय करणार्या कोळी समाजासाठी स्वतंत्र सरकारी शीतगृह निर्माण करावी, पालिका शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावण्याकरिता ठोस पावले सरकारने उचलावीत, अशा मागण्या करण्यात आल्या.
या मोर्चात ओबीसी, एससी, एसटी, मुस्लिम, एनटी, व्हीजेएनटी, ख्रिस्ती आणि बहुजन समाजातील मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.