मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध बॅडमिंटनटूंचे 4 नोव्हेंबर रोजी मुंबईतील द नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे आगमन होत आहे. येथे होत असलेल्या डोममध्ये लीन दान, ली चाँग वी, पीटर गेड, तौफीक हिदायत, ली याँग दे असे जगविख्यातखेळाडू सहभागी होणार आहेत. हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू बँडमिंटनमधील भारतीय महान खेळाडू प्रकाश पदुकोण आणि पुल्लेला गोपीचंद यांच्याबरोबर व्यासपीठावर असणार आहेत.
ही लिजंड्स व्हिजन योनेक्स वर्ल्ड टूर असून तिला योनेक्सचा पाठिंबा आहे. याची सुरुवात 2015 पासून झाली आहे, जागतिकस्तरावर या खेळाबाबत जागरुकता वाढावी आणि सहभाग वाढावा या हेतूने या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.
लीन दान–ऑलिम्पिकमध्ये सलग दोन वेळा पुरुष एकेरीत सुवर्ण पदकं जिंकणारा पहिला खेळाडू. पाच जागतिक चॅम्पिअनशीप आणि सहा ऑल इंग्लंड टायटल्सयांच्या नावावर आहेत. वयाच्या 34व्या वर्षी लीन दान आजच्या घडीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील जगातील तिसऱ्या क्रमांकावर गणले जातात.
ली चाँग वी– वयाच्या पस्तीसाव्या वर्षी जागतिक कीर्तीचा सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून गणना, ली चाँग वी निवृत्ती घेण्याच्या निर्णयाच्या अगदी जवळ असताना,पुन्हा एकदा जगातील क्रमांक एकचे खेळाडू झाले.
पीटर गेड –ट्रीक शॉट्ससाठी प्रसिद्ध असलेले आणि 22 ग्रँड प्रिक्स टायटल्स आपल्या नावावर असलेले खेळाडू, ऑल इंग्लंड आणि युरोपीन चॅम्पियनशीपमधील इतरविजेतेपद पटकवलेले पीटर गेड आता फ्रेंच नॅशनल स्क्वॉडचे प्रमुख प्रशिक्षक आहेत.
तौफीक हैदायित–ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पिअनशीपमध्ये विविध टायटल्स जिंकलेले खेळाडू, यांच्या जोमदार स्ट्रोकमुळे ते जागतिक स्तरावर महान खेळाडू म्हणून मान्यता पावले आहेत.
ली याँग दे–43 सुपर सिरीजची टायटल्स जिंकलेले आणि चार विविध सहकाऱ्यांबरोबर नेहमीच जागतिक स्तरावरील क्रमांक एकवर असलेले खेळाडू. ली यांनी पुरुषदुहेरी स्पर्धांमध्ये 104 आठवड्यांच्या कालावधीच पहिला क्रमांक राखला आहे.
सनराइज स्पोर्ट्स (इंडिया) प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम धार म्हणाले की, “भारतातील पहिलीवहिली लिजंड्स व्हिजन वर्ल्ड टूर आयोजित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या देशात बॅडमिंटनबाबत जागरुकता वाढावी आणि खेळ अधिक मोठ्या प्रमाणात वाढावा या हेतूने, आम्ही हाउपक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात कुठलीही कसुर ठेवलेली नाही. लहान वयापासून ज्यांना पाहात मोठे झालो, ज्यांनी काही अप्रतिम मॅचच्या संस्मरणीय आठवणी ठेवल्या आहेत अशा खेळाडूंना प्रत्यक्ष पाहण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना पहिल्यांदाच मिळणार आहे.’’
भारतीय बॅडमिंटन टीमचे प्रमुख राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद म्हणाले की, “गेल्या काही वर्षांपासून भारतीय बॅडमिंटन सुधारते आहे, लिजंड्स व्हिजनवर्ल्ड टूर एक उत्तम प्रोत्साहक ठरणार आहे, यामुळे भविष्यात अनेक बॅडमिंटन खेळाडू होऊ पाहणाऱ्यांना चालना मिळणार आहे. ’’
किदाम्बी श्रीनाथ, पी. व्ही. सिंधु आणि सायना नेहवाल हे भारतीय बॅडमिंटन स्टार्सही मुंबईतील या महासोहळ्यात सहभागी होणार आहेत.