
मुंबई : आज 14 एप्रिल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त प्रसिद्ध कलाकार चेतन राऊत यांनी पुश पिनांचा वापर करून बाबासाहेबांचे पोर्ट्रेट तयार केले आहे.
सध्या लॉक डाऊन सुरू आहे. त्यामुळे या वर्षी बाबासाहेबांची 129 वी जयंती घरा घरातच साजरी केली जात आहे. राऊत यांनीदेखील आंबेडकरांची अनोखी कलाकृती तयार करत अभिवादन केले आहे.
राऊत म्हणाले की, ६ रंगछटा असलेल्या ४२६६ पुश पिन्स कलाकृती साकारण्यासाठी वापरल्या. 24 इंच बाय 30 इंच अशी ही कलाकृती आहे.















