
डॉ. आर. बद्री नारायण यांच्या उत्तर रेल्वेतील मुख्य प्रशासकीय अधिकारी (टीटी आणि बीआरयू), नवी दिल्ली येथे झालेल्या स्थानांतरणानंतर बी के दादाभोय यांनी सुत्रे हाती घेतली आहेत.
रेल्वे भर्ती मंडळ, मुंबई येथे अध्यक्ष आणि पुण्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणूनही बी के दादाभोय यांनी काम पाहिले आहे. अतिरिक्त महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक होते. त्यांनी इन्सेड सिंगापूर, आयसीएलआयएफ क्वालालंपूर आणि बोकोनी स्कूल ऑफ मॅनेजमेंट, मिलान येथे प्रशिक्षण घेतले आहे. आंतरराष्ट्रीय संगीतकार झुबिन मेहता यांच्या अधिकृत चरित्रासह आठ पुस्तकांचे ते लेखकही आहेत.