
मुंबई : भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक अवान मोटर्सने देशातील सर्वात पसंतीची मोबिलिटी कंपनी बनण्याच्या आपल्या मिशनला अनुसरून जानेवारी २०२० पासून आपले ब्रॅंडिंग बदलून ‘नेक्सझू मोबिलिटी’ असे केले आहे. या बदलानंतर कंपनी फक्त आपले ब्रॅंड नेम बदलणार नाहीये तर सध्याचा उत्पादनांचा पोर्टफोलियो, लोगो व एकंदर मार्केटमधील आपली ओळखही बदलणार आहे.
ब्रॅंड रिफ्रेशचा एक भाग म्हणून कंपनी आपल्या उत्पादनांचा पोर्टफोलियो देखील आणखी मजबूत करत आहे. नेक्सझू मोबिलिटी २ नवीन स्कूटर्स- डेक्स्ट्रो आणि डेक्स्ट्रो प्लस तसेच ३ ई-सायकल्स लॉन्च करेल. त्याचबरोबर एका समर्पित बी२बी प्रोग्रामसह कंपनी सर्वांगीण ई-मोबिलिटीप्रति आपली वचनबद्धता देखील अधिक सशक्त करत आहे. या प्रोग्रामअंतर्गत नेक्सझू मोबिलिटी राईड शेअरिंग / रेंटल कंपन्या, कॉर्पोरेट्स यांच्यासाठी कस्टमाइझ्ड इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्युशन्स देऊ करेल, कॉर्पोरेट लीझिंग, कॉर्पोरेट परचेस, एम्प्लॉयीज प्रेफरेन्शियल प्रोग्राम आणि ईव्हीसाठी सरकारी / खाजगी टेंडर्स साठी मदत करेल.
या ब्रॅंड रीफ्रेशमधील सर्वात महात्त्वाचा भाग म्हणजे कंपनीने आपल्या नावापुढील ‘मोटर्स’ हा शब्द बदलून ‘मोबिलिटी’ हा शब्द घातला आहे. एक इलेक्ट्रिक दुचाकी ब्रॅंड ऐवजी इलेक्ट्रिक मोबिलिटी विभागात सर्वांगीण सोल्युशन प्रदाता असे आपले कार्यक्षेत्र विस्तारीत करणे हे हा बदल करण्यामागील कारण आहे.
नेक्सझू मोबिलिटीचे ब्रॅंड प्रमुख रोहित गोईदानी म्हणाले, “जगाला आमची नवीन ओळख करून देताना मला खूप आनंद होत आहे. नेक्सझू अस्तित्वातयेत आहे, त्यावेळी आम्ही पुन्हा एकदा याचा उच्चार करत आहोत की,आमच्या सर्व उपक्रमांच्या मुळाशी ग्राहक-केंद्रितताच असेल. आम्ही अशी नवनवी उत्पादने निर्माण करत राहू, जी आमच्या ग्राहकांना पसंत पडतील आणि ती देशाच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात क्रांती घडवून आणतील.”















