रत्नागिरी (आरकेजी): गणेशोत्सव तोंडावर आला असताना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ऑटोरिक्षा भाडे दरात २७ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मध्यरात्रीपासून हे भाडे लागू होणार आहेत. भाडेवाढीमुळे गणेशोत्सवानिमित्त गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
रत्नागिरीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी प्रलंबित असलेल्या रिक्षा भाडे निश्चितीचा निर्णय घेतला आहे. सदर निर्णयाला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणचे सदस्य जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने नुकत्याच झालेल्या बैठकीत रिक्षा भाडे निश्चितीच्या निर्णयास मान्यता देण्यात आली. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आता ऑटो रिक्षाचे किमान देय भाडे रु. २७ राहणार असून पुढील टप्प्यासाठी १७.७० प्रति कि.मी. भाडे आकारण्यात येणार आहे. रात्री १५ ते ०५ या कालावधीसाठी आकारवयाचे अतिरिक्त भाडे सध्या २५ टक्के निश्चित करण्यात आले असून लगेजकरिता ३ रुपये आकारण्यात येणार आहे. सदरच्या भाडेवाढीची अंमलबजावणी ६ सप्टेंबर २०१८ च्या मध्यरात्रीनंतर लागू होतील. जिल्हयात एल.पी.जी. इंधनावर चालणाऱ्या रिक्षाचे प्रमाण पेट्रोलवर चालणाऱ्या रिक्षांपेक्षा तुलनेने फार कमी आहे. त्यामुळे भाडेदर निश्चित करताना पेट्रोल या इंधनाचे मुल्य विचारात घेण्यात आले आहे. तसेच ऑटो रिक्षासाठी भाडेदराची परिगणना व्याज व घसारा, विमा व कर, दुरुस्ती व देखभाल खर्च, राहणीमानाचा दर्जा व इंधन खर्च हे घटक विचारात घेऊन करण्यात आली आहे. तरी रत्नागिरी जिल्हयातील सर्व रिक्षा चालक व मालक यांनी आपल्या रिक्षाच्या मीटरमध्ये ०७ सप्टेंबर २०१८ पासून सुधारित भाडेनिश्चिती करावी. तसेच मीटरप्रमाण भाडे न आकारणे व भाडे नाकारणे अशा रिक्षा चालकांविरोधात टोल फ्री दूरध्वनी क्रमांक ०२३५२- २२९४४४ या क्रमांकावर वाहन क्रमांकसह तक्रार नोंदवावी, पोस्ट कार्डद्वारेही तक्रारी स्विकारण्यात येतील याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी यांनी आवाहन केले आहे.