मुंबई (शांताराम गुडेकर )चिंचपोकळी पश्चिम येथील आर्थर रोडच्या श्री स्वामी समर्थ कट्टा परिवाराच्या वतीने १०वी, १२वी व पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार स्वामींच्या मठात संपन्न झाला.व्यासपीठावर कट्टा परिवाराचे अध्यक्ष- बाळ पंडित, सचिव-राजेंद्र चव्हाण, कोषाध्यक्ष- रविंद्र रेवडेकर, सह गंगाराम गायकवाड, लाडोजी परब, रवींद्र आंबेकर, गजानन रेवडेकर, दयानंद महाजन व जनार्दन देसाई व्यासपीठावर उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तू देऊन गुणगौरव करण्यात आला. दयानंद महाजन, गजानन रेवडेकर व बाळ पंडित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सोहळ्याचे सूत्रसंचालन- भास्कर साळुंके व प्रस्तावना- राजेंद्र चव्हाण यांनी केले. आभार रवींद्र रेवडेकर यांनी मानले. स्वामींच्या मठात विद्यार्थी-पालक व स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरत येरम, सागर मेस्त्री, सुर्यकांत नाचरे, जयसिंग परब, संतोष रेवडेकर, जगदीश सावंत, आनंद पेवेकर यांनी फारच मेहनत घेतली होती.