
मुंबई : काँग्रेसतर्फे ‘चले जाव- भारत छोडो’ स्वातंत्र लढयातील हुतात्म्यांना ऑगस्ट क्रांती मैदान येथे मानवंदना व आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना देऊन स्वातंत्र लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, माजी मंत्री व आमदार पतंगराव कदम, नसीम खान,अमीन पटेल, माजी आमदार चरणसिंह सप्रा, अशोकभाऊ जाधव, मधू चव्हाण, मनपा विरोधी पक्षनेते रवी राजा, काँग्रेस पक्ष नेते, नगरसेवक माजी नगरसेवक, जिल्हा अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष व सर्व पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.















