
संग्रहीत छायाचित्र
Mumbai : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुढील श्रीगणेश उत्सव विशेष ट्रेनमध्ये प्रत्येकी दोन शयनयान डब्बे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहे:
01257 लोकमान्य टिळक टर्मिनस- सावंतवाडी रोड विशेष दि. ७.९.२०२१ रोजी.
01247 पुणे- मडगाव विशेष दि. ८.९.२०२१ रोजी.
01259 पनवेल- सावंतवाडी रोड विशेष दि. ८.९.२०२१ रोजी.
01249 पनवेल -करमाळी विशेष दि. १०.९.२०२१ रोजी
वरील गाड्या आता २४ डब्यांसह चालविण्यात येतील.
प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना या गाड्यांमध्ये चढण्यापूर्वी त्यांच्या तिकिटांची स्थिती तपासण्याची विनंती केली जाते.
कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानादरम्यान कोविड-19 शी संबंधित एसओपी, सर्व निकषांचे पालन करून या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी असेल.














