मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : प्रभाग क्रमांक ११२ च्या भाजप नगरसेविका साक्षी दळवी यांच्या गाडीवर तीन अज्ञात व्यक्तिंनी शनिवारी ता. (१५) रात्री १० च्या दरम्यान भांडुपमध्ये हल्ला केला. टॅंक रोड परिसरातून एक कार्यक्रम संपवून त्या दुसर्या कार्यक्रमासाठी जात होत्या. याचवेळी लाल बहादूर शास्त्री मार्गावर असलेल्या मधुबन गार्डन परिसरात अचानक त्यांच्या मोटारीवर दगडफेक झाली. गाडीतील कार्यकर्त्यांनी तिघांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले.या घटनेत कोणी ही जखमी झाले नाहीं.साक्षी दळवी यांनी भांडुप पोलीस ठाण्यात या बाबत तक्रार नोंदविली आहे. भांडुप रेल्स्थावेनक परिसरस फेरीवाला मुक्त करण्यामागे साक्षी दळवी यांची तक्रार केली आहे. या हल्ल्यामागे हे ही कारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.