मुंबई, विशेष प्रतिनिधी:- शेतकरी कायद्याविरोधात देशात भडका उडाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरमध्ये आत्मक्लेश जागर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे.
दिल्लीतील शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभरात जागर आंदोलन करण्यात येत आहे. भजन, अभंग म्हणत रात्रभर हे जागर आंदोलन चालणार आहे. मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहे.