
डोंबिवली : शहरात चार ते पाच दिवसांपासून अतिवृष्टी झाल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले. मुसळधार पावसामुळे चाळीतील घरांचे अतोनात नुकसान झाले होते. डोंबिवली पश्चिमेकडील देवीचा पाडा येथील दत्तात्रय कृष्णा भोईर चाळीतील दोन घरांच्या पाठीमागील भिंत रविवारी कोसळली. यामुळे घरातील कुटुंब घाबरले असून या घराच्या दुरुस्तीची गरज निर्माण झाली आहे. प्रकाश मुंणगेकर आणि गोविंद कोर्लेकर यांच्या घरातील भिंत कोसळली. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. जवळपास 18 वर्ष या चाळीतील हे दोन कुटुंबीय भाडे तत्वावर राहतात.















