डोंबिवली : येथील प्रगती कॉलेज जवळील नांदिवली रस्त्यावरील अतिधोकादायक “साई सदन” इमारत पाडण्याचे काम गुरुवारी सुरू करण्यात आले. मात्र या प्रसंगी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. घरमालक आम्हाला काय देणार असा सवाल करत निदर्शने केली.
नांदिवली येथे साई सदन 1 ते 6 तळ अधिक तीन मजली अतिधोकादायक इमारती आहेत. रहिवाश्याना विश्वासात घेतले नाही. परस्पर कारवाई सुरू केली असा आरोप रहिवाशी करत आहेत. सहा इमारती पैकी 1, 2 व 3 या तीन इमारती अतिधोकादायक असून गुरूवारी 2 क्रमांकाची इमारत पाडण्याचे काम सुरु करण्यात आले. या संदर्भात “ग” प्रभाग अधिकारी चंद्रकात जगताप यांना विचारले असता त्यांनी रहिवाश्यांचा विरोध इमारत पाडण्यासाठी नाही तर घरमालक आम्हाला काय देणार म्हणून त्यांनी मागणी केली. नागरिकांनी या पूर्वीच जागा रिकामी केली असून साई सदन 1, 2 व 3 या अतिधोकादायक असल्याने ती पाडण्याची कारवाई सुरू केल्याचे सांगितले.