
मुंबई: कोल्हापूरच्या बाबासाहेब भोगम यांनी जेष्ठांच्या राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवताना ७० वर्षावरील वयोगटाच्या विविध धावण्याच्या शर्यतीमध्ये तीन सुवर्णपदके पटकावली. मास्टर्स अॅथलेटिक्स ऑफ महाराष्ट्र तर्फे मुंबई विद्यापीठाच्या मारिन लाईन्स येथील क्रीडासंकुलात या स्पर्धांचे आयोजन केले होते. बाबासाहेब भोगम यांनी १०० मीटर शर्यतीत १६.३ सेकंद अशी वेळ नोंदवत वैयक्तिक पहिले सुवर्णपदक जिंकले. या शर्यतीत त्यांनी वसंत सेठिया (१७.३ सेकंद) आणि अनंत निझाई यांना (१८.७) यांना मागे टाकले. बाबासाहेब भोगले यांनी ८०० मीटर शर्यतीत ३ : २४ सेकंद अशा कामगिरीसह दुसऱ्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. ३००० मीटर शर्यतीत भोगम यांनी १५: ०० मिनिटे अशा वेळेसह रघुनाथ लाड यांना तब्बल २ मिनिटांच्या फरकाने मागे टाकत स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक निश्चित केले. या शर्यतीत लाड यांनी १७ :०५ मिनिटे अशा वेळेसह दुसरे स्थान मिळवले
इतर निकाल : ५० वर्षावरील : १०० मीटर : काकासाहेब पाटील (१३:११ सेकंद), पी.के. प्रसन्नन (१३:४२ सेकंद ), भाऊ मेटकरी (१३;६१ सेकंद ). ८०० मीटर : भाऊ मेटकरी (२: ३० :० मिनिटे), पी. के. प्रसन्नन (२:४०: २ मिनिटे ), गिरीश नायर (२:४८:०२ मीटर)
५५ वर्षावरील : १०० मीटर : शेखर पाटील (१३:३ सेकंद ), दीपक पाटील (१३:९ सेकंद), फरहाद कपाडिया (१४.१ सेकंद),
६५ वर्षावरील : १०० मीटर : यशवंत तांडेल (१४ : ९ सेकंद), उमाराम निथरवाल (१५:४ सेकंद ), हरीश घोटकुले (१५.०० सेकंद).