डोंबिवली, (प्रशांत जोशी) : अथर्व वारंग या सात वर्षांच्या शाळकरी मुलाचा मृतदेह देसलेपाडा येथील नव्याने बांधण्यात येत असलेल्या सात मजली इमारतीच्या ड्रेनेज टाकीत सापडल्याची घटना २४ मी रोजी उघडकीस आली होती. अथर्वची हत्या करण्यात आली होती, हे स्पष्ट झाले होते. मानपाडा पोलिसांना दोन महिन्यानंतर या घटनेतील दोन आरोपिंना पकडण्यात यश आले. अटक आरोपींना २४ जुलैपर्यत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. दरम्य्न, या प्रकरणी ड्रेनेज टाकीवर झाकण बसवीले नाही, म्हणून पाच बिल्डरांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून अटकही करण्यात आली होती.
एहसान साबीर आलम ( २२ , मूळ गाव, बेतवारी, बिहार ) आणि नदीम जाकीर आलम ( २१ ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. कल्याण परिमंडळ – ३ चे पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांनी पोलिसांनी अथक मेहनत घेऊन आरोपींना अटक केल्याची माहिती दिली. सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनी गजाजन काब्दुले, पोलीस निरिक्षक ( गुन्हे ) सुरेशकुमार राऊत यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी वेगवेगळी पथके तयार केली. खबरीमार्फत सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेंद्र भोयर, महेश जाधव, किरण वाघ, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाळदे, पोलीस हवालदार घार्गे, पोलीस नाईक सपकाळे, चौरे, पवार, गडगे यांनी आरोपींचा शोध घेऊन अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.