रत्नागिरी (आरकेजी): ‘जीवन की ढलने लगी शाम’ ही माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कविता पद्म्मश्री पद्माजा फेणाणी यांनी सादर करून अटलजी यांना आदरांजली वाहिली. या कवितेेवर विद्यार्थ्यांनी ताल धरला.
रत्नागिरीमध्ये रास नृत्यालयाची त्रैमासिक सभा नुकतीच पार पडली. दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. असे नवनवीन उपक्रम राबवून रसिकांना आणि शास्त्रीय नृत्य शिकणाऱ्या रत्नागिरीतील उदयोन्मुख विद्यार्थ्यांना अनमोल भेट देण्याचा ‘रास’ चा हा अनोखा प्रयत्न असल्याचा कार्यक्रमाच्या प्रमुख पाहूण्या दाक्षायणी बोपर्डीकर म्हणाल्या. ‘रास’ च्या संचालिका श्रुुती आठल्ये यांनी कलाकारांशी गप्पा या सदरातून नृत्याचे महत्त्व विषद केले. मीरा भावे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. आर्या जावडेकर, पुणे व चिन्मयी श्रोत्री, पुणे यांनी त्रिदेवता स्तूती, रुपकथक, ठुमरी, त्रिवेणी आणि भजन या कथक मधील पारंपारिक रचना सादर करुन रसिकांना यावेळी मंत्रमुग्ध केले.