रत्नागिरी दि. ०७ :केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकरीता मंत्रालयाकडून अटल वयो अभ्युदय योजनेअंतर्गत सर्व वृध्दांची चांगल्याप्रकारे देखभाल करण्यासाठी वृध्दाश्रम योजना चालू करण्याचे प्रस्तावित असून योजने अंतर्गत वृध्द महिलांसाठी विशेष व्यवस्था तसेच सर्व राज्यांमध्ये वृध्दांकरीता चांगल्या प्रतीचे केअर सेंटर सुरु करण्याचे देखील प्रस्तावित आहे.
तरी जिल्हयातील जेष्ठ नागरिक/वृध्द महिला/जेष्ठ नागरिक संघ यांनी या योजनेअंतर्गत आपली नोंदणी या कार्यालयाचे दूरध्वनी क्र. 9765505566 या क्रमांकावर व्हॉटस ॲप द्वारे अथवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रत्नागिरी email-acsworatnagiri.gmail.com या संकेतस्थळावर तात्काळ पाठविण्यात याव्यात असे आवाहन श्री. एस.एस. चिकणे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रत्नागिरी हे करीत आहेत.