नवी दिल्ली : अटल पेंशन योजना ५३ लाख लोकांपर्यंत पोहोचली असून २३५ बँका आणि टपाल कार्यालयामार्फत या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. सध्या ७२ टक्के पुरुष खातेदार तर ३८ टक्के महिला खातेदार आहेत.
देशात १ जून २०१५ पासून अटल पेंशन योजना कार्यान्वित झाली असून १८ ते ४० वयोगटातल्या सर्व नागरिकांसाठी ही योजना लागू आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीने ज्या प्रमाणात पैसे भरले असतील त्यानुसार ६० वर्षांनंतर त्या व्यक्तीला प्रती महिना १००० ते ५००० रुपये मिळू शकतात.