
अलिबाग दि.16:- अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील नाना पाटील हायस्कूल, पोयनाड, इयत्ता 6 वी (अ) मधील विद्यार्थीनी तनिष्का राकेश पाटील हिला दि.8 ते दि.12 जानेवारी 2026 रोजी गोवा येथील राष्ट्रीय स्पर्धेत मांस रेसिलंग ब्रॉझ मेडल व बेल्ट रेसलिंग सिल्व्हर मेडल मिळाले आहे. मेडल मिळण्याकरिता शिक्षक संतोष कवळे आणि त्यांची टीम तसेच आई-वडील व घरातील वडीलधारी सर्व मंडळी शाळेय शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
विविध स्पर्धेत तनिष्का राकेश पाटील हिला मिळालेल्या मेडल बाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे. :-दि. 13 एप्रिल 2025 1st State Level open Karate चांपियन 2025 खोपोली Bronze medal. दि.3 ऑगस्ट 2025 रोजी अलिबाग येथे तालुकास्तरीय स्पर्धेत Gold medal मिळाले व नाशिक येथे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली. दि.23 व दि.24 ऑगस्ट 2025 रोजी नाशिक येथे गतका असोशिएशन ऑफ रायगड Bronze medol मिळाले. दि.08 सप्टेंबर 2025 रोजी अलिबाग येथे ऑल महाराष्ट्र थांग.ता असोशिएशन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक मिळवून Gold ट्रॉफी मिळाली व अमरावती येथे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. दि. 19 व दि.21 सप्टेंबर रोजी ऑल महाराष्ट्र थांग ता असोशिएशन अमरावती येथे राज्यस्तरीय स्पर्धित Bronze medol मिळाले. दि.21 नोहेंबर व दि.30 नोहेंबर 2025 रोजी मुरुड येथे हिवाळी प्रशिक्षण शिबीरामध्ये मास रेसलिंग comprion घेतले. त्यात प्रथम क्रमांक मिळवून Gold medol मिळाले व गोवा येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात झाली. दि.30 डिसेंबर 2025 रोजी जिल्हास्तरीय शलिय थांग-ता. मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धेत ब्राँझ मेडल मिळाले.















