हे नवीन ११.६” क्रोमबुक, शैलीदार डिझाइन, भक्कम बांधणी, आरामदायी टायपिंग, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी व अतिजलद कनेक्टिविटीसहप्रत्येकाच्या गरजा पूर्ण करणार
ठळक मुद्दे
- नवीनतम असुस क्रोमबुक CX1101च्या माध्यमातून, डिजिटल पद्धतीने शिक्षण, ई-कॉमर्स, सामाजिक आंतरक्रिया तसेच कामाची सुविधा उपलब्ध करून देऊनभारतातील लक्षावधी ग्राहकांना सक्षम होण्यात मदत करण्याचे असुसचे उद्दिष्ट
- गुगलचे क्रोम ओएस, इंटेलचा या विभागातील आघाडीचा सेलेरॉन एन४०२० ड्युअल-कोअर प्रोसेसर, वेगवान ४जीबी रॅम, ६४ जीबी ईएमएमसी एवढे दमदार स्टोरेज यांमुळे असुस क्रोमबुक CX1101, क्रोम ओएस, अँड्रॉइड आणि लिनक्स अॅप्समध्ये अखंडित बहुकार्यात्मकता (मल्टि-टास्किंग) देते
- असुस क्रोमबुक CX1101, या विभागातील अग्रगण्य ४२ डब्ल्यूएच बॅटरीने युक्त आहे, त्यामुळे १३ तासांपर्यंत अखंडित व दीर्घ बॅटरी बॅकअपची सुविधा मिळते तसेच ४५डब्ल्यू यूएसबी-सी चार्जरमुळे क्रोमबुक जलदगतीने चार्जही होते
- ३.२ टाइप-सी आणि टाइप-ए अशी दोन पोर्टस्, एचडी कॅमेरा, स्टिरिओ लाउडस्पीकर्स, ड्युअल-बॅण्ड वाय-फाय फाइव्ह आणि ५.२ ब्ल्यूटूथ या सर्वांनी सुसज्ज असलेले असुस क्रोमबुक CX1101 श्रेष्ठ दर्जाची ऑनलाइन द्विमार्गी अध्ययन व व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा देऊ करते
- असुस क्रोमबुक CX1101मध्ये अँटि-ग्लेअर एचडी डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले एका १८० अंशातील सपाट सक्षम हिंजवर बसवलेला आहे. त्याची ३०,००० खुल्या व बंद जीवनचक्र चाचण्या घेण्यात आल्या आहेत आणि हा डिस्प्लेला विभागातील सर्वाधिक दणकट व खात्रीशीर डिस्प्ले म्हणून मिलिट्री-ग्रेड एमआयएल-एसटीडी-८१०एच रेटिंगही आहे
- यामध्ये एज-टू-एज कीबोर्ड फुल साइज कीजसह आहे, १.५ मिमीचे की ट्रॅव्हल आहे. याची क्षमता १० दशलक्ष कीस्ट्रोक्स एवढी अविश्वसनीय आहे. हे गळती-रोधक अर्थात स्पिल-प्रूफही आहे. अनावधानाने यावर काही द्रवपदार्थ सांडल्यास ६० सीसीपर्यंत द्रवाचा प्रतिरोध करण्याची क्षमता यात आहे
- असुस क्रोमबुक्स, क्रोम ओएस आणि गुगल प्ले स्टोअर यांच्यासह, १० लाखांहून अधिक अँड्रॉइड अॅप्स, वेब अॅप्स, गुगल वर्कस्पेस अॅप्स यांना सपोर्ट करते आणि तुमच्या अँड्रॉइड उपकरणांशी तसेच अन्य अनुकूल (कम्पॅटिबल) उपकरणांसाठी अखंडितपणे सिंक राखते.मायक्रोएसडी कार्डाद्वारे याचे स्टोरेज २ टीबीपर्यंत विस्तारले जाऊ शकते
- याची विक्री फ्लिपकार्टवर १५ डिसेंबरपासून सुरू होत आहे; स्वागत प्रस्ताव म्हणून १५ ते २१ डिसेंबर २०२१ या काळात ग्राहक असुस क्रोमबुक CX1101 १८,९९९ रुपये अशा विशेष दरात खरेदी करू शकतात
मुंबई, भारत, डिसेंबर १३, २०२१ –असुस या तैवानी तंत्रज्ञान कंपनीने तसेच भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या लॅपटॉप ब्रॅण्डने आज आपल्या नवीन ११.६ इंची असुस क्रोमबुक CX1101च्या लाँचिंगची घोषणा केली. लष्करी दर्जाच्या दणकट खात्रीशीरतेच्या माध्यमातून दैनंदिन उत्पादनक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने हे उत्पादन डिझाइन करण्यात आले आहे. हे उत्पादन बाजारात आणून असुसने फ्लिपकार्ट या भारतातील होमग्रोन ई-कॉर्मस बाजारपेठेसोबतचा संबंध अधिक दृढ केला आहे. ग्राहकांच्या उत्क्रांत होत जाणाऱ्या आवश्यकता पूर्ण करण्यामध्ये फ्लिपकार्ट हा ब्रॅण्ड अग्रेसर आहे.
या वैविध्यपूर्ण तसेच दणकट उत्पादनांच्या सीरिजला, इंटेल® सेलेरॉन®एन४०२० ड्युअल-कोअर प्रोसेसर, ४जीबी वेगवान रॅम, वेगवान ६४ जीबी सॉलिड-स्टेट ईएमएमसी स्टोरेज आणि गुगलची प्रख्यात क्रोम ओएस, यांचे पाठबळ आहे. त्यामुळे याद्वारे वेगवान व भरवशाचे कम्प्युटिंग व बहुकार्यात्मकता शक्य होत आहे. क्रोमबुकचे स्टोरेज मायक्रोएसडी मेमरी कार्डद्वारे २ टीबींपर्यंत विस्तारले जाऊ शकते.
क्रोमबुक विभागातील सर्वोत्तम दणकट खात्रीशीरता आणि उत्पादनक्षमता सुधारणाऱ्या सुविधा पुरवते. यांमध्ये १० दशलक्ष कीस्ट्रोक्स क्षमतेसह अपवादात्मक दर्जाचे सोयीस्कर टायपिंग शक्य करणारा एज-टू-एज स्पिल-रेझिस्टण्ट कीबोर्ड, वेगवान ड्युअल-बॅण्ड वाय-फाय५+ ब्लूटूथ ५.१ कनेक्टिव्हिटी आणि १३ तासांपर्यंत दीर्घ बॅकअप देणारी महाकाय ४२ डब्ल्यूएच बॅटरी यांचा समावेश होतो. १८० अंशांतील सपाट हिंजवर बसवलेल्या सोयीस्कर अँटिग्लेएर एचडी डिस्प्लेमुळे कण्टेण्ट शेअर करणे तसेच मित्रमंडळी, सहकारी व क्लाएंट्ससोबत संवाद साधणे सुलभ होते.
ही सीरिज गुगलच्या सर्वोत्तम सुविधाही देऊ करते. यांमध्ये गुगल प्लेवरील अॅप्सच्या भरगच्च लायब्ररीचा समावेश होतो. वेगवान कामगिरी, भक्कम सुरक्षितता आणि सोयीस्कर सुविधा यांच्यामुळे असुस क्रोमबुक CX1101 केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर झटपट सुलभ कम्प्युटिंगची आवश्यकता असलेल्या सर्वांसाठी सर्वोत्तम आहे.
असुसचे भारत व दक्षिण आशिया विभागाचे विभागीय संचालक लिओन यु,नवीन क्रोमबुक लाँचबद्दलम्हणाले, “शक्ती व उत्पादनक्षमता यांचा आदर्श मिलाफ साधणारा, असुस क्रोमबुकचा आणखी एक व्हराएंट, बाजारात आणणे आमच्यासाठी थरारक अनुभव आहे. भारतातील शिक्षण व उद्योजकतेची बाजारपेठ वेगाने उत्क्रांत होत असताना, ग्राहकांना दूरस्थ पद्धतीने काम करण्यासाठी तसेच हायब्रिड अध्ययन पद्धतीसाठी, योग्य ती साधने व तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून सहाय्य करणे अत्यावश्यक आहे. असुस क्रोमबुकला मिळालेला अफलातून प्रतिसाद बघता, नवीन व्हराएंटCX1101 व्यग्र जीवनशैलीला सक्षम करण्याच्या दृष्टीने विकसित करण्यात आला आहे. यातील सुविधा उत्तम आहेत आणि तो तुमच्या प्रवासाच्या आवश्यकतांसाठी अत्यंत टिकाऊ आहे.”
असुस इंडियाच्या सिस्टम बिझनेस ग्रुपमधील कमर्शिअल पीसी अँड स्मार्टफोन विभागाचे बिझनेस हेड दिनेश शर्माया लाँचबद्दल म्हणाले, “ग्राहकांनी दूरस्थ काम करणे व अध्ययनाची जीवनशैली अवलंबल्यामुळेभारतातील क्रोमबुक विभाग प्रचंड वाढीवर आला आहे. काम, अध्ययन, मनोरंजन अशा ग्राहकांच्या उत्क्रांत होत जाणाऱ्या आवश्यकता पूर्ण करणारे शक्तिशाली, अत्यंत दणकट, तरीही ट्रेण्डी व पोर्टेबल असुस क्रोमबुक CX1101 लाँच करताना आम्ही रोमांचित झालो आहोत. बहुकार्यात्मकता आणि सुधारित कामगिरीसह आम्ही ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी एक आदर्श उपकरण देण्यास उत्सुक आहोत.”
फ्लिपकार्टचे वरिष्ठ संचालक राकेश कृष्णनक्रोमबुक CX1101च्या लाँचिंगबद्दल म्हणाले, “काही वर्षांपूर्वी एक मर्यादित विभाग असलेली क्रोमबुक्स कोविड साथीच्या काळात संपूर्ण उद्योगक्षेत्राला व्यापणारा प्रवाह कशी झाली हे बघणे घेणे खूपच रोचक आहे. एक होमग्रोन ई-कॉमर्स बाजारपेठ म्हणून फ्लिपकार्ट असे प्रवाह ओळखण्यास कायमच अग्रेसर राहिली आहे आणि हे प्रवाह जास्तीत-जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्यात उद्योगक्षेत्रातील सहयोगींसोबत सक्रियपणे काम करत आहे. असुसच्या नेतृत्वाखाली लॅपटॉप्सच्या या विभागाची झालेली उत्क्रांती बघताना मला आनंद होत आहे. असुसने या उत्पादनाच्या विस्तृत स्वीकृतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. असुस क्रोमबुक CX1101 बाजारात आल्यामुळे ग्राहकांच्या घरातून काम करण्याच्या, शिकण्याच्या, मनोरंजनाच्या उत्क्रांत होत जाणाऱ्या आवश्यकतांची पूर्तता होणार आहे.”
छोटेसे, कमी वजनाचे आणि एर्गोनॉमिक डिझाइन – एमआयएल-एसटीडी-८१०एच मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणामुळे असुस क्रोमबुक CX1101 असामान्यरित्या खात्रीशीर झाले आहे. धातूच्या हिंजेस (बिजागिऱ्या) आणि स्पिल-रेझिस्टण्ट कीबोर्डसमुळे ते अत्यंत दणकट झाले आहे. तरीही हे उपकरण अत्यंत छोटेसे आणि आटोपशीर आहे. व्यावसायिक कारणांसाठी केला जाणारा प्रवास किंवा शाळेतील आयुष्यासाठी हे उपकरण पूर्णपणे सुसज्ज आहे. त्यामुळे व्यावसायिक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक त्यांची गुंतवणूक खात्रीशीर व दीर्घकाळ टिकणारी आहेत असे समजून निश्चिंत होऊ शकतात. क्रोमबुकमधील कीबोर्डवर १.५ मिमी की-ट्रॅव्हल असल्याने प्रवासात टायपिंग आरामाचे होते. तुम्ही संपूर्ण दिवसभर याच्यावर काम करू शकता. काही द्रवपदार्थ सांडल्यास कीबोर्ड एका मर्यादेपर्यंत त्याचा प्रतिरोध करतो आणि याची कीस्ट्रोक क्षमता १० दशलक्ष आहे.
स्मार्ट उत्पादनक्षमता–टिकाऊपणा आणि उत्पादनक्षमता यांचा मिलाफ हे असुस क्रोमबुक CX1101चे निर्णायक वैशिष्ट्य आहे. डेस्कवर १८० अंशात सपाट राहणाऱ्या डिस्प्लेमुळे वापरकर्ते अध्ययनाचे नवीन मार्ग या उपकरणाच्या माध्यमातून शोधू शकतात. मल्टि-जेश्चर ट्रॅकपॅडमुळे मेन्यू बघणे किंवा वेबवर भटकंती अत्यंत सोपी होते, समन्वय सुलभ होतो. लॅपटॉपमध्ये स्मार्ट उत्पादनक्षमता सुविधांचा संपूर्ण संच आहे. यांमध्ये ऑल-स्कूल-डे बॅटरी लाइफ आणि आय/ओ पोर्टसची वैविध्यपूर्ण निवड यांचा समावेश होतो. असुस क्रोमबुकमध्ये एचडी कॅमेरा व लाउड स्टिरिओ स्पीकर्सही आहेत. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तसेच मनोरंजन उत्तम प्रकारे होते.
संपूर्ण दिवसाचा सोबती – दिवसभराच्या कम्प्युटिंगसाठी डिझाइन करण्यात आलेले असुस क्रोमबुक CX1101 पूर्ण चार्ज केले असता, पुढील १३ तास पूर्णक्षमतेने सक्षम असते. यातील ४२ डब्ल्यूएच लिथियम-आयन बॅटरी पॅकमुळे हे शक्य होते. एचडी रिझोल्युशन डिस्प्लेसह असुस क्रोमबुक CX1101 श्रेष्ठ दर्जाचे रंग व तपशील दाखवते. याशिवाय दिवसभर चालणाऱ्या कम्प्युटिंगच्या दृष्टीने यात अँटि-ग्लेअर डिस्प्ले ठेवण्यात आला आहे.
क्रोम ओएसमुळे विचारपूर्वक सुलभ कम्प्युटिंग – असुस क्रोमबुक्स हे दिवसाचे उत्तम सोबती आहे, कारणत्यातील गुगलची सुलभ ऑपरेटिंग सिस्टम मिनिटभराच्या आत बूट अप होते. ही ओएस विनाकटकट, वेगवान आणि अजिबात लर्निंग कर्व्ह नसलेल्या अखंडित कामाच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आली आहे. क्रोम ओएसमध्ये गुगल प्ले स्टोअर सपोर्ट आहे. यामुळे तुम्हाला आधीपासून माहीत असलेल्या हजारो अॅप्सना सपोर्ट मिळतो. लहान मुले व मोठ्यांसाठी तयार करण्यात आलेले हे उपकरण तुमच्या आयुष्याचा काही भाग सोपा करण्यात हातभार लावेल.
उपलब्धता आणि दर
असुस क्रोमबुक CX1101ची फ्लिपकार्टवरील किंमत १९,९९९ रुपये एवढी आहे. स्वागत प्रस्ताव म्हणून ग्राहक १५ ते २१ डिसेंबर २०२१ या काळात असुस क्रोमबुक CX1101 १८,९९९ रुपये अशा सवलतीच्या दरात खरेदी करू शकतात. एसबीआय बँकेच्या कार्डांद्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १० टक्के तत्काळ सवलतीचा लाभ घेता येईल. तसेच ईएमआय व्यवहारांमध्ये विनाशुल्क ईएमआयचा लाभ (६ महिन्यांसाठी) घेता येईल.