नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन 15 डिसेंबर ते 5 जानेवारी 2018 या कालावधीत होणार आहे, असे संसदीय व्यवहार मंत्री अनंत कुमार यांनी सांगितले. संसदीय व्यवहारावरील केंद्रीय मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीनंतर अनंतकुमार यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली.
हिवाळी अधिवेशनाच्या 22 दिवसांच्या कालावधीत एकूण 14 सत्र होणार आहेत. अधिवेशनाच्या कामकाजाची विषयसूची ठरवण्याकरता झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह होते. अधिवेशनाचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन अनंतकुमार यांनी म्हटले आहे.