
मालाड,ता.8(वार्ताहर) ,: मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज मालाड (प.), ‘चोक्सी हॉस्पीटल’ मध्ये सुरु करण्यात आलेल्या कोरोना लसीकरण केंद्राला भेट देत तेथील संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच आदर्श लेन, एव्हरशाईन नगर, मालवणी गेट क्र ६ महानगरपालिका रुग्णालय, मालवणी-म्हाडा, मढ, मार्वे, गोरेगाव स्पोर्ट्स क्लब इत्यादी ठिकाणी सुरू होणाऱ्या लसीकरण केंद्रांचीही पाहणी केली व सोयी सुविधांचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक लोकप्रतिनिधी, कॉंग्रेस कार्यकर्ते व पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
लसीकरणासाठी येणाऱ्या जेष्ठ नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी अस्लम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली काॅंग्रेसच्या माध्यमातून चहा-पाणी, अल्पोपहार तसेच जेष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रांपर्यंत घेऊन जाण्यासाठी नि:शुल्क गाड्यांची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.