मुंबई, (निसार अली) : मालाड पश्चिमेतील काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचे छायाचित्र शिवसेनेच्या बॅनरवर धनुष्यबाण निशाणीसह लागल्याने मालाडमध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक व सद्या शिवसेनेचे पदाधिकारी असलेले माणकू सिंह उर्फ बिल्लाजी यांनी मालाड पश्चिमेत गणेशोत्सवाचे शुभेच्छा बॅनर लावले आहेत. या बॅनरवर शिवसेनेचे आमदार व पदाधिकारींसह आमदार अस्लम शेख यांचे छायाचित्र आहे. त्यांच्या बाजूला भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांचेही छायाचित्र आहे. आमदार शेख यांच्या छायाचित्राच्यावरती आणि नावाच्या बाजूला धनुष्यबाण ही शिवसेनेची निवडणूक निशाणी दाखवण्यात आली आहे. जर आमदार हे काँग्रेसचे आहेत तर शिवसेनेची निशाणी कशी? असा प्रश्न बॅनर पाहणार्यांना पडला आहे. अस्लम शेख शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा मालाडमध्ये मात्र रंगू लागली आहे.
धनुष्यबाण निशाणीसह काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचे छायाचित्र शिवसेनेच्या बॅनरवर; प्रवेशाची चर्चा
” मी मालाडचा आमदार असल्याने बिल्लाजी हे दर वेळेस गणेशोत्सवाच्या शुभेच्छा बॅनरवर माझे छायाचित्र लावतात, असे आमदार अस्लम शेख यांनी सांगितले.